कर्जबाजरी शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्जबारीपणाला कंटाळून तालुक्यातील पिंप्रीभोजना येथील एका वयोवृध्द शेतकर्‍याने आपल्या शेतातच मृत्यूला कवटाळल्याची घटना आज पहाटे घडली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पिंप्री भोजना येथील परबत रूपा कोळी ( वय ७० ) यांच्यावर कर्ज होते. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी पेरणी केली असली तरी पाऊस न आल्यामुळे ते काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होते. यानंतर आज पहाटे त्यांचा मृतदेह हा शेतात आढळून आला. त्यांनी काही तरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे आढळून आले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा परबत कोळी यांचा मृतदेह ह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला होता. तर या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते. परबत कोळी यांच्या आत्महत्येमुळे परिसरातू हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content