सर्पमित्र मयूर कदमने पकडला भला मोठा अजगर (व्हिडीओ )

चाळीसगाव दिलीप घोरपडे । तालुक्यातील सांगवी फाटा येथील एका शेतात मोठा अजगर शेतात काम करणार्‍यांना दिसून आला. त्यांनी तातडीने सर्पमित्र मयूर कदम याला पाचारण केले. मयूरने शिताफीने याला पकडून जंगलात सोडून दिले.

याबाबत वृत्त असे की, घाटारोड वरील पटेल ढाब्यासमोर असलेल्या तालुक्यातील सांगवी फाट्याजवळ विनायक दवे यांच्या शेतात भला मोठा अजगर असल्याचे रविवारी दुपारी आढळून आले. यामुळे तेथे काम करणार्‍या शेत मजुरांची धांदल उडाली.

दरम्यान, लागलीच याची माहिती पंचशील नगर चाळीसगाव येथील सर्पमित्र मयुर कदम (९१५८२४१६८५) याला दिल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी जाऊन अथक परिश्रमानंतर भला मोठा वजनदार व लांबलचक अजगर मोठ्या शिताफीने पकडला. लागलीच या अजगराला जंगलात सोडून दिला व त्याचे प्राण वाचवले. सर्पमित्र मयूर कदम हा नेहमीच तालुक्यातील जनतेच्या सेवेत असून तो सर्पांना पकडून जंगला सोडत असतो. दरम्यान, त्याने भला मोठा अजगर पकडून त्याला वाचविल्याने त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खालील व्हिडीओत पहा या चित्तथरारक घटनेचा थरार.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/695718784356395

Protected Content