चाळीसगाव येथील महाविद्यालयात विविध उपक्रमांचे उद्घाटन

40 gaon 1

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मॅनेजिंग बोर्डचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त बी.पी. आर्ट्स, एस.एम. सायन्स, के.ले.सी कॉमर्स महाविद्यालयात विविध विकास कामांचे उद्घाटन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

यावेळी नारायण म्हणाले की, संस्थेच्या विविध शाखांमध्ये होणाऱ्या विविध विकास कामे करण्यासाठी माझ्या शरीरात उर्जा संचारते व मला मनस्वी आनंद होतो. तसेच आपण महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना केलेल्या कार्याचा लेखाजोखा महाविद्यालयाच्या उन्मेष या अंकात असणार आहे. म्हणून हा अंक आपल्या जीवनात संग्रहित करून ठेवला पाहिले अस मला वाटते. कारण, एकदा महाविद्यालयाचा अंक हा त्या महाविद्यालयाचा संपूर्ण दर्शन घडविणारा असतो.

चाळीसगाव महाविद्यालयात मीडिया रूम, गणित विभागातील डिजिटल क्लास रूम, जैव तंत्रज्ञान पोस्टर प्रदर्शन, महाविद्यालयाचे नियतकालीक उन्मेष प्रकाशन, रक्तदान शिबिर, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र, सीसीटीव्ही, एक्सटेन्शन, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना मोफत बस पासेस् चे वितरण, ज्युनिअर कॉलेज मधील नवीन संगणकीकृत सुविधा कक्ष तसेच भौतिक रसायन शास्त्र, प्रयोगशाळा यांचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायनदास अग्रवाल यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलींद बिल्दीकर यांनी महाविद्यालयात झालेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा उपस्थितांन समोर मांडला.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, ॲड प्रदीप अहिरराव, मु.रा अमृतकार, क.म राजपूत, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन नाना कुमावत, अशोक वाणी, प्रशिल आग्रवा, योगेश पाटील, अँड. धनंजय ठोके, ॲड.पूष्कर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. मिलिंद बिलदिकर, उन्मेष संपादक प्रा.डी.एल वसईकर इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. किरण गंगापूरकर यांनी केले तर आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले.

Protected Content