४२ दिवसांत येणार ऑक्सफोर्डची लस !

लंडन वृत्तसंस्था- जगाचे लक्ष लागलेल्या ऑक्सफर्डची लस आगामी सहा आठवडे म्हणजे ४२ दिवसांमध्ये तयार होणार आहे. शास्त्रज्ञांनी लशीच्या यशस्वीतेबाबत घोषणा केल्यानंतर ब्रिटनमध्ये ताबडतोब आपात्कालीन परिस्थितीत बाधितांना ही लस देण्यात येणार आहे.

जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे. जवळपास अडीच कोटींच्या घरात करोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. जगभरातील. काही लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. जगाचे लक्ष लागलेल्या ऑक्सफर्डची लस आगामी सहा आठवडे म्हणजे ४२ दिवसांमध्ये तयार होणार आहे. शास्त्रज्ञांनी लशीच्या यशस्वीतेबाबत घोषणा केल्यानंतर ब्रिटनमध्ये ताबडतोब आपात्कालीन परिस्थितीत बाधितांना ही लस देण्यात येणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इम्पिरिअल कॉलेजचे वैज्ञानिक लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात पोहचले आहेत. दोन्ही विद्यापीठांनी स्वतंत्रपणे विकसित केलेल्या लशीची वेगवेगळी चाचणी होत आहे. ब्रिटनच्या सर्वच नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे . सध्या ब्रिटन सरकार लॉकडाउनचे निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत बरीच खबरदारी बाळगत आहे.. नाताळाच्या काही दिवस आधीच लोकांना लस देण्याचा प्रयत्न आहे

Protected Content