कोरोना : जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

जळगाव शहरात आज ४ रुग्ण तर जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर ८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content