कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही 1421 वर पोहोचली

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात एका दिवसात 91 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही 1421 वर पोहोचली आहे.

 

राज्यात कोरोनाची तीव्र लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या 1421 वर पोहोचली आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात एका दिवसात 91 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही 1421 वर पोहोचली आहे. यात 183 पोलीस अधिकारी आणि 1238 पोलीस कर्मचाऱ्यांना तीव्र लक्षण जाणवली आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे पोलीस दलासह आरोग्य यंत्रणा देखील चिंतेत पडली आहे.

Protected Content