एसटी कर्मचाऱ्यांकडून डिझेलची परस्पर विक्री; तीन जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जयप्रकाश पेट्रोलपंपावरून तीन जणांनी बसमध्ये न भरता इतर खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात महामंडळाच्या कर्मचाऱ्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव बसस्थानक आगारात संभाजी भास्कर काळे रा. सायगाव ता.चाळीसगाव हा नोकरीला आहे. १० मे ते १४ मे दरम्यान संभाजी काळे याने चाळीसगाव शहरातील जयशंकर पेट्रोल पंपावर राज्यपरिवहन मंडळाचे बस क्रमांक (एमएच २० बीएल २४१२), (एमएच ४० एन ९८१६),(एमएच २० बीएल २३५७) आणि (एमएच २० बीएल ३५०७) क्रमांकाच्या बसमध्ये डिझेल न भरत परस्पर मौसीन सलीम शेख रा. जुना विमानतळे रेल्वे हाऊसिंग सो.चाळीसगाव आणि मयूर नामदेव म्हस्के रा. मराठी शाळेच्या मागे खरडई नाका चाळीसगाव यांच्या मदतीने खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरून चोरटी विक्री केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्ण निकम यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.

Protected Content