पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने केलेल्या सुचनेनुसार पाचोरा एम. एम. महाविद्यालयात आज सकाळी पावणे अकरा वाजता सामुहिक राष्ट्रगान करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपराचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, नायब तहसीलदार मोहन सोनार, रणजित पाटील, भागवत पाटील, प्रकाश भोसले, पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, मंडळ अधिकारी अनिल पाटील, प्रतिक्षा मनोरे, वरद वाडेकर, सुरेश पाटील, सुरेश साळुंखे,भरत परदेशी, प्रा. अतुल सुर्यवंशी, प्रा. जे. डी. गोपाळ, प्रा. डॉ. श्रावण तडवी, प्रा. डॉ. कमलाकर इंगळे, प्रा. डॉ. माणिक पाटील, प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, प्रा. योगेश पूरी, प्रा. प्रविण डोंगरे, राजेंद्र वळवी, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस, दिलीप सुरवाडे, साईदास जाधव, किरण बाविस्कर, दगडू मराठे, रमेश मोरे, भरत पाटील, तलाठी आर. डी. पाटील, मयूर आगरकर, नकुल काळकर, संदिप चव्हाण, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल डी. एस. कोळी, ई. डी. शिवदे सह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, सहकार विभाग व पाचोरा महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार कैलास चावडे व निवडणूक नायब तहसीलदार रणजित पाटील यांनी मतदान कार्डास आधार लिंक करण्याचे आवाहन केले.