पाचोरा येथील नागरिकांना मिळणार पर्यायी मार्ग : ए.एम. फाउंडेशनतर्फे पाठपुरावा

पाचोरा, प्रतिनिधी पाचोरा कृष्णापुरी हिवरा नदी पुलच्या पर्यायी रस्त्याबाबत अनिल महाजन यांनी पाठपुरावा केल्यानंतर नगरपरिषदेत नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याने ए. एम. फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा मागे घेतला.   

पाचोरा शहरातील कृष्णापुरी लगत असलेल्या हिवरा नदीवरील पूलाची उंची वाढवण्यासाठी सदर पुलाचे बांधकाम पाचोरा नगरपरिषदने सुरू केले आहे. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ए. एम. फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी या पुलाचे काम सुरू असतांना नागरिकांसाठी पर्यायी मार्ग करुन द्यावा यासाठी वेळोवेळी नगर पालिकेस निवेदनाद्वारे कळविले होते. या गंभीर विषयावर दि. २३ रोजी नगरपालिकेत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहील, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ए. एम. फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल महाजन, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, संबंधित ठेकेदार मनोज शांताराम पाटील, माजी नगरसेवक दत्ता बोरसे, अॅड. शांतीलाल सौंदाने, भरत मिस्तरी उपस्थित होते.

या बैठकीत ठेकेदार मनोज पाटील यांनी सांगितले की, हिवरा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणुन पांचाळेश्वर पुल सुरु आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला आलेला पूराबाबत आगामी घडणाऱ्या घटनांचा ही विचार करण्यात आला आहे. कोणाचीही जीवित हानी होऊ नये याची ही काळजी घेण्यात येत आहे. तीन महिन्यात हिवरा नदीवरील पुलाचे बांधकाम आम्ही पूर्ण करून देऊ. पुलाचे बांधकाम सुरू असतांना  वाहनांच्या येण्या जाण्यासाठी तात्पुरता स्वरूपात रॅम्प देखील टाकण्यात येणार आहे. त्या रॅम्पवरून पायी  जाणाऱ्या लोकांना रस्ता वापरता येईल अशी ग्वाही ही ठेकेदार मनोज पाटील यांनी दिली. यावेळी चर्चे दरम्यान अनिल महाजन व स्थानिक नागरिक यांचे समाधान झाल्याने अनिल महाजन यांनी ए. एम. फाऊंडेशनच्या वतीने आंदोलनाचा दिलेला इशारा मागे घेण्यात आला. यावेळी अनिल महाजन यांनी पाचोरा न. पा. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकाऱ्याचे आभार मानले. गावातील रहिवासी अनिल महाजन हे व्यवसाय निमित्ताने मुबंईला राहून सुद्धा आपल्या गावाबद्दल आपुलकीने लक्ष देतात यामुळे स्थानिक नागरिकांनामध्ये अनिल महाजन यांच्या कामाचे अभिनंदन होत आहे.

Protected Content