पहूर येथे महावीर पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

pahur news 1

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । येथील महावीर पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन प्रदीप लोढा व एपीआय राकेशसिह परदेशी, किरण बर्गे, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, सरपंच पती रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, रवी मोरे, कृषी पंडीत पतसंस्था संस्थेचे चेअरमन बाबूराव पांढरे, अरुण घोलप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर लहान मुलांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीत म्हणून स्वागत केले. देशभक्तीपर गीत व ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अशा कार्यक्रमाने रंगारंग स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रम अतिशय शांततेत व व्यवस्थित पार पडला लहान मुलांचा त्यांच्या पालकांचा उत्साह बघण्यासारखा होता. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने पालक, श्रोते मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाला डॉ. बैरागी शेंदुर्णी, डॉ. वानखेडे, डॉ. घोंगडे, डॉ. क्षीरसागर, दीपक भाऊ लोढा, तेजराजजी जैन, पंकज लोढा, ईश्वर बारी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रिन्सिपल एस. आर. कुलकर्णी मॅडम , चव्हाण सर, आसिफ पिंजारी, कंडारे मॅडम, नेमाडे मॅडम, हटकर मॅडम, थोरात मॅडम, वेदकर मॅडम, लोहार मॅडम, रूपाली मॅडम, सोनल, क्षीरसागर मॅडम, किरण भट व शाळेच्या सर्व शिक्षक स्टाफने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी सादर केलेल्या कलाविष्काराने पालक, श्रोते मंत्रमुग्ध झाले.

Protected Content