भडगाव येथील पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Bhadgaon news

भडगाव प्रतिनिधी । घरातील रेशनकार्ड वर मिळणारे ऑनलाइन धान्य पुरवठ्याबाबत पुरवठा विभाग व रेशन दुकानदाराकडून मानसिक त्रास दिला जात आहे. धान्यपुरवठा कोणतीही पूर्व कल्पना न देता ऑनलाइनहुन आरसी डिटेल्स रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेशनकार्ड धारक राहुल वाघ यांनी दिली. यात मोठा भ्रष्टाचार झाला असून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची मागणी तहसीलदारांना अर्ज देऊन त्यांनी केली आहे.

आमरण उपोषणाचा इशारा
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे देखील त्यांनी सदरच्या बेकायदेशीर कृत्या विरुद्ध आपण सखोल चौकशी करण्याचे आदेश त्वरीत द्यावे २७ जानेवारी २०२० पर्यंत चौकशी होऊन संबंधितांना कडक शासन न झाल्यास व नथा भिवा अहिरे यांचा स्वस्थ धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द न झाल्यास २८ जानेवारी २०२० पासून मी तहसिल कार्यालय भडगाव समोर आमरण उपोषणास बसणार आहे असा अर्ज देखील त्यांनी केला आहे.

भडगाव येथील रहिवासी राहून वाघ यांचे येथील यशवंत नगर भागात रेशन दुकानदारकडून धान्य मिळणे अपेक्षित होते. यापूर्वी तत्कालीन तहसीलदार सी.एम.वाघ यांनी धान्यपुरवठा देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही अनेक महिने होत आली तरी धान्य मिळत नसल्याने डिसेंबर महिन्यात अचानक ऑनलाईन धान्य आरसी डिटेल्स तपासली त्यात राहुल वाघ यांचे नाव प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये दिसत होते. रेशनकार्ड क्रमांकावर धान्य कोटा गहू 12 किलो, तांदूळ 8 किलो, तूरडाळ 1 किलो, चनादाळ 2 किलो असा धान्यकोटा दिसत होता . तरी मा. तहसीलदार मॅडम यांनी २० जानेवार २०२० रोजी असे लेखी उत्तर दिले की आपली शिधापत्रीका ऑनलाईन पाहिली असता ती ( NPH ) योजनेत दिसून येते. आपली शिधापत्रीका ही प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटात समाविष्ट नसल्याने आपणास आज रोजी अन्न धान्याचा लाभ देता येत नाही असे खोटे उत्तर दिल्यामुळे तहसीलदार मॅडम यांच्यावरही चौकशी बसवावी व कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती राहुल वाघ यांनी शासनास केली आहे.

कोट –
या प्रकरणात तहसीलदार मॅडम या देखील जबाबदार आहे. असे त्यांना या लेखी उत्तर दिल्याने कळून आले असे त्यांचे मत आहे. शिवाय या आधी डिसेंबर महिन्याचे रेशन घेण्यासाठी गेलो असता दुकानदार यांनी मी तुझे रेशनकार्ड ऑनलाईन केले आहे म्हणून मला 750 रुपयांची मागणी केली होती. शिवाय पैसे न दिल्यामुळे व मी याबाबत तक्रार केल्यामुळे माझे ऑनलाइन हुन या डिटेल्स हटवण्यात आले आहे. ऑनलाईन कोटा डिटेल्स मुद्दाम मला न सांगता मी दुकानदार यांची तक्रार केल्यामुळे हटविण्यात आल्या आहेत. शिवाय भडगाव तालुक्यातील असंख्य लोकांना आपले रेशन सुरू झाले आहे. याची कल्पनाच नसते. बऱ्याचदा यावरील धान्य कोट्यावर दुकानदार डल्ला मारतात असे नागरिक सांगतात. त्यामुळे आजतागायत मिळत असलेल्या ग्राहकांची यादी तहसीलदार कार्यालयात बाहेर खुली ठेवावी.
– रेशनकार्ड धारक राहुल वाघ

Protected Content