फैजपूर येथे श्रीमद् भगवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन

faizur news

फैजपूर प्रतिनिधी । मिसाईल रेजीमेंट गाव-पावडा हरीयाणा येथील रहिवाशी मेजर दिपचंद नाईक यांनी 1999 च्या कारगील युध्दात टोलोलींगची लढाई यशस्विपणे जिंकली. या यध्दात दोन्ही पाय आणि एक हात त्यांना गमवावा लागला. फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भगवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमात त्यांची उपस्थिती लाभणार आहे.

कारगिल युध्दांचे हीरो मेजर दिपचंद नाईक 1999 च्या कारगिल युध्दामध्ये त्यांनी आपले दोघी पाय व उजवा हात देशासाठी गमवावा लागला, 1989 मिसाईल रेजीमेंटचे हीरो मेजर दिपचंद नाईक हे गाव-पावडा हरीयाणा येथील रहीवासी असून त्यांनी व त्यांच्या सहकार्यांना टोलोलींग ची लढाई यशस्वी पणे जिंकली.

30 जानेवारी 2020 सोमवार रोजी दुपारी 2 श्रीमद् भागवद कथा ज्ञानयज्ञ समिती फैजपूर यावल-रावेर तालुका वारकरी भाविक भक्त फैजपूर येथे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. हस्ते चित्रकला व रांगोळी स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी हभप प्रसाद महाराज अमळनेर यांचे मार्गदर्शन खाली व उपस्थितीत 27 कुंडी महाविष्णूयाग, हभप चैतन्य महाराज, देगलुर कर यांचे अमृतवाणीद्वारे योगी पावन मनाचा या विषयावर प्रवचन महोत्सव व गाथा पारायण नामसंकीर्तन सप्ताह अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमांची दैनंदिनी याप्रमाणे
दैनिक कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा, सकाळी 6 ते 7 विष्णू सहस्त्र नाम, सकाळी 8 ते 11 गाथा पारायण, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दुपारी 3 ते 5 योगी पावन मनाचा, मुक्ताई चिंतन (वाटीचे अभंग ) या विषयावर विदवत रत्न हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन होईल. यज्ञ महोत्सव पूजा 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दररोज सकाळी 8 ते 1, यज्ञ आचार्य वेदमूर्ती वेदभूषण पूज्य हेमंत लक्ष्मण धर्माधिकारी महाराज नाशिक व ब्रम्हवृंद फैजपूर, पारायण 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दररोज सकाळी 8 ते 12, रात्री 8 ते 10 कीर्तन कार्यक्रम, 27 रोजी भरत महाराज पाटील, बेळीकर, 28 रोजी माधव महाराज राठी, नाशिक, 29 रोजी संदीपान महाराज शिंदे आळंदी, 30 रोजी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, जोशी बाबा बीड, 31 रोजी पांडुरंग महाराज घुले, श्रीकेश्त्र देहू, 1 फेब्रुवारी रोजी जयवंत महाराज बोधले पंढरपूर, दि 2 रोजी चैतन्य महाराज देगलुरकर, 3 रोजी चंद्रशेखर महाराज देगूलकर यांचे कीर्तन होतील. तर 26 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 6 खंडोबा वाडी मंदिरापासून सुरुवात होणार असून 30 रोजी रक्तदान शिबीर, रांगोळी व चित्रकला स्पर्धा होईल.

सदरील कार्यक्रम खंडेराव वाडी देवस्थान येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास परीसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन व्ही.ओ.चौधरी, युवराज, अर्जुन सोळुंके लोधी, कमलाकर कोष्टी, सी.पी.भालेराव, ए.के.महाजन, राजेंद्र जावळे भाविक भक्त व देशप्रेमी यांची उपस्थीती प्रार्थनीय आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे.

Protected Content