गणित ऑलम्पियाड परिक्षेत अमेय सराफ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील सेंट अँन्स इंग्लिश मीडियम स्कूलचा वर्ग दहा ‘अ’चा विद्यार्थी अमेय अमोल सराफ यांनी सन २०२२-२३ या सत्रात घेण्यात आलेल्या गणित ऑलम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त करीत इंटरनॅशनल रँक १ असे यश प्राप्त केले आहे.

त्याचे या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर रत्ना मेरी व शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सुजाता उबाळे व शिक्षिका फातिमा टीचर यांना देतो. त्याला नुकतेच शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर रत्ना मेरी यांच्या हस्ते मेडल ऑफ डिस्टिंक्शन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Protected Content