ऑनलाईन पोलीस भरती अर्जासंदर्भात उमेदवारांचे अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस भरतीत एका घटकात एकापेक्षा जास्त अर्ज भरलेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना बुधवारी १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पोलीस भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. नियमानुसार एका जिल्ह्यातून एका वेळेस एकच अर्ज भरण्याचा होता. परंतू विद्यार्थ्यांनी वेगवेगळे इमेल आयडी तयार करून एकापेक्षा जास्त अर्ज भरले आहे. हे नियमांचे उल्लंघन आहे. तसचे मुंबई येथे शारिरीक परिक्षत पास झालेल्या उमेदवारांची यादी १५ एप्रिल नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तरी मैदाणी चाचणीच्या मिरीट लिस्ट लागण्या आगोदार त्यांना बाद करण्यात यावे, तसेच मुंबई चालक या पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीत एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या उमेदवारांना चालक चाचणी आगोदर बाद करून नविन सुधारित मैदानी यादी जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना देण्यात आले आहे.

Protected Content