यावल शहरात कोरोना जनजागृतीसाठी पोलीसांचे पथसंचलन

यावल प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस कहर वाढतच असून गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यातही कोराना रूग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात पोलीस प्रशासनाने कोरोना जनजागृतीसाठी पथसंचलन उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे. याची सुरूवात यावल शहरातून करण्यात आली. आज शहरातून पोलीसांनी पथसंचलन करून कोरोना संसर्गाविषयी जनजागृतीचा संदेश दिला.

संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुसंसर्गाने गेल्या काही दिवसापासुन यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राला आपल लक्ष केले असून या भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसंदिवस अत्यंत वेगाने वाढत असुन या पार्श्वभुमीवर कोरोनाच्या महामारी संकटासमयी आपले जीव धोक्यात घालून अहोरात्र यावलकरांसाठी धावणारे कार्यत्पर अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी आज पुन्हा कोरोना जनजागृती करण्यासाठी पुनश्च एक अभीनव उपक्रमाव्दारे यावल शहरातील नागरीकांना तसेच तालुक्यातील सर्वाधीक कोरोना प्रभावित क्षेत्र असलेल्या साकळी गावासह किनगाव, कोरपावली , दहिगाव या गावात तालुक्यातीत पोलीस पाटील आपले पोलीस कर्मचारी यांच्या सोबत घेवुन या ठिकाणी जनजागृतीपर पथसंचलन करण्याचा संकल्प केला आहे. पोलीसांसह होमगार्ड दलाचा देखील सहभाग आहे.

कोरोना संसर्गा विषयाची जनजागृती मोहीमेची सुरुवात आज सकाळी ८ वाजेपासून यावल शहरात करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी या कोरोनाविरूद्ध जनजागृतीच्या मोहीमही नागरीकांच्या सहकार्य शिवाय पुर्ण होणार नसल्याचे सांगुन कोरोनाच्या विरूद्धच्या लढयात नागरीकांनी एकजुटीने एक मनाने एकसंघाने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच आपण हा जागतित पातळीवरील महामारी विरूद्धचा लढा जिंकण्यात यशस्वी होवु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Protected Content