खुबचंद साहित्या प्रकरणात चार जणांना अटक

Arest Jail Pakrau 1

जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर 16 जानेवारी रोजी झालेल्या जिवघेण्या हल्ला प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी राकेश चंदू आगरिया (22, रा.वाघ नगर, जळगाव) व निलेश नंदू पाटील (24, रा.कोल्हे नगर, मुळ रा.फागणे, ता. धुळे) हे दोघं जण मंगळवारी पोलिसांना शरण आले. तर आज गणेश अशोक बाविस्कर (वय-25, रा. तुरखेडा जि.जळगाव) आणि नरेंद्र चंदू आगरिया (वय-24, रा.वाघ नगर, जळगाव) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

चौघांना आज बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी माजी महापौर ललित कोल्हे व आणखी 2 जण फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणात १० ते १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यावेळी घटनास्थळी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. दरम्यान, नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्यात खुबचंद साहित्या यांच्यावर १६ रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर साहित्या यांच्यावर शहरात प्राथमिक उपचार करुन दुसऱ्‍या दिवशी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

Protected Content