Home Cities धरणगाव दुबईतील जबिल पार्क येथे जिजाऊ जयंती साजरी

दुबईतील जबिल पार्क येथे जिजाऊ जयंती साजरी


dubai program

दुबई, विशेष प्रतिनिधी | येथील जबिल पार्क येथे नुकताच (दि.१७) जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अमोल कोचळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तत्पूर्वी सर्व उपस्थितांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण केली. त्यानंतर सर्व मंडळींनी जिजाऊ व त्यांच्या कार्याविषयी आपले मत मांडले.

 

आशिष जीवने, जयंत रंगारी, विक्रम भोसले, अभिजीत देशमुख, पंकज आवटे, रामेश्वर कोहकळे, राहुल घुले व रघुनाथ पाटील यांनी जिजाऊ यांच्या चरित्राबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. या जिजाऊ जयंती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमादरम्यान ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ हे पुस्तक सर्व उपस्थितांना भेट देण्यात आले. यावेळी सर्वांनी येथून पुढे वाचन करण्याचा निश्चय केला. हा कार्यक्रम जबिल पार्क या अतिशय सुंदर ठिकाणी घेण्यात आला, तेथील वातावरण खूप प्रसन्न होते. जिजाऊ जयंतीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखील गानुचे, साईनाथ मांजरे, विनय डकरे, अन्वर खान व झारखंडचे कुमार संजय यांनी विशेष प्रयत्न केले.


Protected Content

Play sound