Home Cities धरणगाव धरणगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. रूपाली महाजन यांची बिनविरोध निवड ; सफाई कर्मचारी...

धरणगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. रूपाली महाजन यांची बिनविरोध निवड ; सफाई कर्मचारी युनियनकडून विशेष सत्कार

0
9


धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या महत्त्वाच्या निवडीत सौ. रूपाली पवन महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

धरणगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडीत सौ. रूपाली पवन महाजन यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह सफाई कर्मचारी युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पप्पू भाऊ भावे, नगरसेवक विलास भाऊ महाजन, गटनेते कडू आप्पा बयस, पवन भाऊ महाजन आणि सद्दाम भैया यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

याप्रसंगी सफाई कर्मचारी युनियनचे पदाधिकारी नरेंद्र बिवाल, सुखदेव वाघरे, प्रवीण पचेरवाल, चेतन मराठे यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सौ. रूपाली महाजन यांचा भावुक व आदरपूर्वक सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून, नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, त्यांच्या सोयी-सुविधा आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सकारात्मक आणि ठोस भूमिका घेतील, अशी सार्थ अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound