‘त्या’ अपघातातील तिसऱ्या तरुणाचा मृत्यू; चौथाही अत्यवस्थ

f57c9000 f803 424a babe 59b5c48597c7

जळगाव प्रतिनिधी । समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 19 रोजी किनोद-फूफनी गावादरम्यान घडली होती. या अपघातातील समोरच्या दुचाकीवरील तरुणाचाही आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. दरम्यान, चौथ्या जखमीची प्रकृती ही अत्यवस्थ असल्याचे कळते.

 

याबाबत माहिती अशी की, भूषण विठ्ठल सोनवणे (23) आणि रवींद्र भगवान सोनवणे (27, दोन्ही रा. देवगाव ता. जळगाव) हे तिघे जण जळगाव येथे 19 रोजी रेशन धान्यच्या कामानिमित्त आले होते. जळगावातील आटोपल्यानंतर दोघे आपली दुचाकी क्र.( एम एच 19, 0657 ) दुपारी चार वाजेच्या सुमारास जात होते. त्यावेळी किनोद-फूफनी गावादरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात भूषण सोनवणे, रवींद्र सोनवणे यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर जितेंद्र हुकूम सोनवणे (वय 26) रा. फूफनी यांच्यासह बारकू बारेला (पुर्ण नाव गाव माहित नाही) गंभीर जखमी झाला होता. दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यातील जितेंद्र सोनवणे याची आज प्रकृती खालावल्याने त्याला मुंबई येथे नेण्यात येत होते. परंतू प्रवासातच कसारा घाट दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. जितेंद्रचा मृतदेह जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. जितेंद्र हा आपल्या पत्नी व दोन मुलांसह पुण्याला नोकरीला होता. गावात कामाच्या निमित्ताने आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. मयत जितेंद्रच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, तालुका पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content