खडसेंच्या कोरोनावर रिसर्च व्हावे : महाजनांचा खोचक सल्ला ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । एकदा झालेला कोरोना सहसा दुसर्‍यांदा होत नाही. मात्र एकनाथराव खडसे यांना तिसर्‍यांदा कोरोना झाल्यामुळे आम्हाला त्यांची चिंता वाटत आहे. यामुळे त्यांच्या कोरोनाबाबत रिचर्स व्हावे असा खोचक सल्ला माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिला आहे. ते आज जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

जळगावातील सुप्रील कॉलनीत अमृत योजनेच्या माध्यमातून पाणी पोहचल्यानिमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलतांना आमदार गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना झालेल्या कोरोनाबाबत संशयकल्लोळ व्यक्त केला.

आ. गिरीश महाजन म्हणाले की सध्या कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात अजून एक नवीन उदाहरण समोर आले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोना झाल्यामुळे आपल्याला चिंता वाटत आहे.

खडसे यांना २० दिवसात दुसर्‍यांदा कोरोना झाला. या आधी सुध्दा त्यांना कोरोना झाला होता. यामुळे तिसर्‍यांदा कोरोना झाल्यामुळे आपल्याला खूप काळजी वाटत आहे. हे नेमका कोणता रोग आहे यावर रिसर्च होण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आपण याबाबतची माहिती केल्याची माहिती देखील आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा आ. गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते ?

Protected Content