वाहनाच्या धक्क्यात भिंत कोसळल्याने बालक ठार; तीन गंभीर जखमी

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असतांना डीजेची गाडीचा धक्का भिंतीला  लागल्याने भिंत कोसळले. यात 12 वर्षाचा मुलगा जागेवरच ठार झाला तर 3 जण जखमी झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वाडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान  डीजे असलेले वाहन मागेपुढे घेत असतांना वाहनाचा धक्का भिंतीला लागल्याने भिंती वरील काही भाग अचानक कोसळुन हर्षल गोकुळ पाटील (खंबाट) या १२ वर्षाच्या बालकाच्या अंगावर कोसळला भिंतीला लावलेल्या जुनाट व मोठमोठ्या विटा असल्याने त्या खाली तो दाबला जावून त्याच्या मेंदूला जबरी मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृत देह बाहेर काढल्या नंतर काही युवक पडलेल्या विटा बाहेर काढत असतांना त्यांना हर्षलच्या पायाची हाडे सापडली. तर यात प्रदिप प्रकाश तळेकर (वय – २२), रोहित विनोद गव्हांडे (वय – १२) व साही रामेश्वर शिंदे (वय – १०) हे तीन बालके गंभीर जखमी झाले. जखमीवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मयताच्या पाश्च्यात  आई, वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

Protected Content