शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात ५१ शैक्षणिक व्याख्यानांची मालिका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवजयंतीचे औचित्य साधून नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्ह्यात करियरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ५१ व्याख्यानांची मालिका आयोजीत करण्यात आली आहे.

१५ फेब्रुवारी ते २० मार्च या काळात यशवर्धिनी करिअर महायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या अंतर्गत ५१ व्याख्यानांतून मार्गदर्शन केले जाणार आहे. व्याख्यानांद्वारे नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील पन्नास हजारांहून अधिक तरुणांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

या अंतर्गत विविध शहरे व खेड्यांमध्ये आयएएस, यूपीएससी-एमपीएससी, बँकिंग, पीएसआय विक्रीकर निरीक्षक, आयआयटी, मेडिकल या क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जळगाव शहरात ६ महाविद्यालयांत व धरणगाव, अमळनेर , चोपडा, भडगाव, यावल, पाचोरा, एरंडोल, बांभोरी, पाळधी, अमरावती, कारंजा डांभुर्णी, पातोंडा, म्हळसर, शहादा, नंदुरबार, राजूर, कुर्‍हाकाकोडा, अंतुर्ली, मुक्ताईनगर, वरणगाव, रावेर, जामनेर येथे व्याख्याने व कार्यशाळा होणार आहेत.

तरूणांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन नोबेल फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content