भरधाव कारने दुचाकीला उडविले : दोन युवक ठार

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील ग्रामीण रूग्णालयासमोरच्या चौफुलीवर भरधाव वेगाने धावणार्‍या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री ९ वाजेच्या सुमारास भडगाव येथील ग्रामीण रूग्णालयाच्या समोर भीषण अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकीची (क्र.एम.एच.२७-ए.सी.६८४३) हायवेवरील वळणावर धडक झाली. यात अमोल दीपक सोनवणे (वय १५, रा.यशवंतनगर) याचा जागीच मृत्यू झाला. तर पंकज भारत भोई (वय १८, रा. भोईवाडा) हा गंभीर जखमी झाला. त्याला प्रारंभी पाचोरा येथील रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी त्याला जळगावला हलवण्यात आले. मात्र, जळगावातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मयत अमोल सोनवणे हा लाडकूबाई माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. या अपघातामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघात होताच कारचालक आपले वाहन सोडून फरार झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तर भडगाव पोलीस स्थानकात या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content