नायगाव येथे आदिवासी तडवी समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील नायगाव येथे मोठ्या उत्साहात आदिवासी तडवी समाजाचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यात १३ जोडपे विवाहबध्द झालीत. सामुहिक विवाह सोहळ्यातील प्रत्येक जोडप्यास वृक्ष भेट देत सांगोपणाची जवाबदारी आणी पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील नायगाव येथील कौमी एकता फाउंडेशन व यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प यांच्या संयुक्‍त विद्यमाने आदिवासी तडवी, भील समाजाचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी १६ मे रोजी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सामुहिक विवाह सोहळ्यात १३ जोडपे विवाहबध्द झालेत. या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना एकात्मिक आदिवासी विकास विभाग यावल यांच्या मार्फत कन्यादान योजनेचा लाभ मिळणार आहे.

या सामुहिक विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. याकुब तडवी होते तर प्रमुख उपस्थितीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी रमेश चौधरी, आमदार शिरिष चौधरी, माजी आमदार कैलास ‘पाटील, माजी आमदार सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी.पाटील नासिक नगरसेविका आशा तडवी, चोपडा साखर कारखाना चेअरमन अतुल ठाकरे, जिल्हा परिष आरोग्य व शिक्षण माजी सभापती रविंद्र पाटील, संजय गांधी योजना समिती चेअरमन शेखर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत पाटील, ऐंउ इमाम तडवी, माजी आयुक्त नासेर तडवी, हाजी मुस्तुफा तडवी, रशीद तडवी, नसिम तडवी, मजीद तडवी, हाजी रमजान तडवी, खतीब तडवी, मासुम तडवी, एम. बी. तडवी, सावदा उपनगराध्यक्ष शबाना तडवी, पोलिस उपनिरिक्षक परविन तडवी, सहाय्यक फौजदार फरीद तडवी, प्रकल्प कार्यालयातील जावेद तडवी, बबलु तडवी, राजु तडवी वनविभागाचे विक्रम पदमोर, सिंकदर तडवी आदींची उपस्थिती होती .

 

 

Protected Content