ओबीसी आरक्षण बचाव समितीचे लवकरच जनसंपर्क अभियान-महाजन

पाचोरा प्रतिनिधी | शरद पवार आणि एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे जनसंपर्क अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अनिल महाजन यांनी दिली आहे.

सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले त्याबाबत अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी मोर्चे आंदोलन सुरू केले आहे पण गेली पाच वर्षपासून ओ.बी.सी. समाजाला संघटन करून जागृत करण्याचे काम महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व ओ.बी.सी. जनक्रांती परिषद चे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन हे करत आहेत.
आता त्यांनी ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची घोषणा केली आहे. माजी मंत्री राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व शरद पवार यांच्या नेतृत्वात राज्यभर ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ची सुरवात महाराष्ट्र मध्ये करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व ओ.बी.सी. समाजातील घटकांना एकत्र करून लढा उभारण्यात येणार आहे असे यावेळी अनिल महाजन यांनी बोलतांना सांगीतले.

या संदर्भात अनिल महाजन पुढे म्हणाले की, व्ही. पी. सिंग यांचे सरकार केंद्रात असतांना मंडल कमिशन लागू करण्यात आले होते त्याची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असतांना त्यांनी सर्वात अगोदर ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. बहुजनांचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनखाली अनिल महाजन हे राज्यभर लवकरच दौर्‍यावर निघणार आहेत ओबीसी समाजाच्या राजकीय रद्द झालेले आरक्षण पुन्हा सुरू करावे यासाठी बारा बलुतेदार, आलुतेदार ओ.बी.सी. समाजाला जागृत करण्यासाठी जनलढा उभारण्यासाठी ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान लवकरच सुरू करण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!