विठू नामाच्या गजरात निघाली व्ही.एच.पटेल विद्यालयाची दिंडी

v.h.patel

चाळीसगाव प्रतिनिधी । ‘तुझिया नामाची शाळा भरली’, ‘पंढरी हसली गोड किती, माऊली माऊली शाळा गरजली’ असा विठू नामाचा गजर करत आज दि. 9 जुलै मंगळवारी रोजी सकाळी 8 वाजता व्ही.एच.पटेल प्राथ.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परिसरात दिंडी काढण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, दिंडीचे आयोजन येत्या आषाढी एकादशी निमित्त करण्यात आले होते. पालखीत शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा तसेच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती ठेवण्यात आली होती. शाळा समितीचे चेअरमन व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेच्या बांधकाम समितीचे चेअरमन व युवा उद्योजक योगेश अग्रवाल, योगाचार्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.राजपुत, मुख्याध्यापक भाऊ जगताप आदी उपस्थित होते. दिंडी शाळेच्या पटांगणातून काढण्यात आली तर दिंडी म.फुले कॉलनीतुन करगाव रोडवरुन, तहसिलदार कार्यालय मार्गे स्टेशन रोडने पुन्हा शाळेत दाखल झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी रामकृष्ण हरीचा गजर करतांनाच स्वच्छता पाळा, आजार टाळा, स्वच्छ नगरी जणू पंढरी, माझी शाळा, सुंदर शाळा. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वाटेत ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले. ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी पालखीचे दर्शन घेतले. दिंडीच्या सांगतेला विद्यार्थ्यांनी टाळांचा ठेका देत ‘विठ्ठल माझा…मी विठ्ठलाचा’ भजन म्हटले. क.मा.राजपुत यांनी विद्यार्थ्यांना योगाबद्दल माहिती सांगितली. दिंडी यशस्वी करण्यासाठी शिक्षक ना.का.मोरे, सुजाता मोरे, जिजाबराव वाघ, राजश्री शेलार, सचिन चव्हाण, स्मिता अमृतकार, अजय सोमवंशी, रेखा चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content