ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडून वकीलाची ३० हजारात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । गुजरात येथून बांधकामाचे साहित्य पोहचविण्याच्या मोबदल्यात ट्रन्सपोर्ट कंपनीने बळीराम पेठेतील वकीलाची ३० हजार रूपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, ॲड. केदार किशोर भुसारी (४५,रा.बळीराम पेठ) यांच्या शिवाजी नगरात सुरु असलेल्या बांधकामासाठी मोरबी, गुजरात येथून टाईल्स व सॅनिटरी बुक केले होते. जस्ट डायल पोर्टलच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला होता. त्यानंतर एका मोबाईलधारकाने ऍड.भुसारी यांच्याशी संपर्क साधून ट्रकचे २० हजार रुपये भाडे सांगितले होते.  ४ ते ७ जून दरम्यान ऍड.भुसारी यांनी स्वत: १० हजार रुपये पाठविले तसेच मित्र लोकेश भगत यांच्या खात्याकडून प्रत्येकी १० हजार या प्रमाणे २० हजार रुपये ऑनलाईन संबंधिताच्या बँक खात्यात भरले. मात्र पैसेही मिळाले नाहीत व बांधकामाचे साहित्य घेवून ट्रकही आला नाही. फसवणुकीची खात्री झाल्यावर ऍड.भुसारी यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार उल्हास चर्‍हाटे करीत आहेत.

Protected Content