माती टाकण्यावरून वृध्दासह मुलाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घरासमोर माती टाकल्याच्या कारणावरून एका वृद्धासह मुलाला तीन जणांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण करत दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, पंढरीनाथ लहान सोनवणे (वय-६०) रा.सुजदे ता.जि. जळगाव हे वृद्ध आपले परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या गल्लीत राहणारा बाळू देवा सोनवणे याने  त्यांच्या घरासमोर माती टाकली. त्यावर पंढरीनाथ सोनवणे यांनी माती टाकू नको असे सांगितले, याचा राग आल्याने बाळू देवा सोनवणे, गोपाळ बाळू सोनवणे आणि जिजाबाई बाळू सोनवणे या ठिकाणी पंढरीनाथ सोनवणे यांच्या अंगावर दगड फेकून दुखापत केली तर भांडण सोडवण्यासाठी आलेला मुलगा शशिकांत सोनवणे याला देखील चपटाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.

ही घटना घडल्यानंतर वृद्धाने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी बाळू देवा सोनवणे, गोपाळ बाळू सोनवणे आणि जिजाबाई बाळू सोनवणे या तिघांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील करीत आहे.

 

Protected Content