हॉर्न वाजविण्यावरून तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ शहरातील आंबेडकर नगरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एका तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, अजय भीमराव तायडे (वय-३३) रा. आंबेडकर नगर, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून राजन उर्फ गोलू खरात, राजकुमार खरात, हंसराज खरात, रजनी खरात आणि घनघाव (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. समता नगर, भुसावळ यांनी शिवीगाळ करत लोखंडी फायटरने मारहाण करून अजयला जखमी केले.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर अजय तायडे याने उपचार घेतल्यानंतर मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाहीत संदेश निकम करीत आहे.

Protected Content