जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ मार्केटच्या गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण (व्हिडीओ)

जळगाव राहूल शिरसाळे । महापालिका प्रशासनाच्या गाळेधारकांकडून होत असलेल्या थकबाकी वसूलीसह गाळे सील करण्याच्या कार्यवाहीला विरोध दर्शविण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ मार्केटमधील गाळेधारकांनी साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. 

बेमुदत असलेल्या या आंदोलनात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पाच जणांच्या गटाकडून आंदोलनात सहभाग घेतला जाणार आहे. महापालिका आणि गाळेधारक हा संघर्ष गेल्या ८ वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्य शासनाने कायद्यात केलेली दुरुस्ती लक्षात घेता नूतनीकरण करणे तसेच पात्र नसलेल्या गाळेधारकांच्या ताब्यातील गाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने गाळेधारकांकडील थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी तसेच थकबाकी न भरणारे व्यापार्‍यांचे गाळे सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यास गाळेधारकांचा विरोध होत आहे. लाखोंची बिले भरण्यास गाळेधारक तयार नाहीत. 

त्यामुळे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात गाळेधारकांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन आंदोलनाची परवानगी मागितली होती. त्यानुसार आज मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी आंदोलनात गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, उपाध्यक्ष राजस कोतवाल, सचिव युवरात वाघ, तेजस देपुरा यांचा सहभाग होता. रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत गाळेधारकांच्या पाच जणांच्या गटाकडून हे आंदोलन केले जाणार आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/323124619283766

Protected Content