निसर्गाशी जुळल्याशिवाय काहीही साध्य होत नाही : पक्षी मित्र शिल्पा गाडगीळ

जळगाव (प्रतिनिधी) निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक काही काळासाठी निसर्गाचा विचार करतात. परंतु स्वतः निसर्गाशी जुळल्याशिवाय काहीही साध्य होत नाही असे प्रतिपादन पक्षी मित्र शिल्पा गाडगीळ यांनी बुधवारी केले. एकता रिटेल किराणा मर्चंटस् नागरी पतसंस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्षीप्रेमी नागरिकांना मोफत चिमणीचे घरटे आणि धान्य फिडर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.

 

 

नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ, राजेंद्र गाडगीळ उपस्थित होते. शिल्पा गाडगीळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, पक्षांबाबत विचार करायला लागल्यावर त्यांच्याबाबतची माहिती आपण जाणू शकतो. चिमण्यांनाही इतर पक्षांकडून धोका असतो. त्यामुळे त्यांना सुरक्षीत वाटतील अशी घरटी तयार करावी. पक्षी जगविण्याची मानसिकता मनुष्याची मनातूनच असते. परंतु त्यात सातत्य कायम ठेवावे, असे आवाहन गाडगीळ यांनी केले.

 

मनोज गोविंदवार यांनी, आपण आपल्या अहंकारात जगत असल्याने निसर्ग संपत आहे. पर्यावरणाचे काहीही बिघडत नाही तर आपले बिघडतेय्. चिमणी दुर्मिळ होताय याचा अर्थ आपलं अस्तित्व कुठेतरी धूसर होतेय हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे असे त्यांनी सांगितले. प्रा.विजेता सिंग यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया यांनी, जळगावात मोठ्याप्रमाणावर पक्षीपे्रमी आहेत. आज पतसंस्थेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा उद्देश वर्षभरात चिमण्यांची संख्या तिप्पट करण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मेहरूण तलाव वाचविण्यासाठी प्रयत्न करावे

शहराचे सौंदर्य असलेला मेहरूण तलाव कधीकाळी पक्ष्यांनी समृध्द होता. अनेक पक्षी दूरवरून त्याठिकाणी येत होते. परंंतु आज त्याठिकाणी सिमेंटचा ट्रक बांधून पक्का डांबरी रस्ता तयार करण्यात येत आहे. त्या रस्त्यावरून रहदारी वाढून पक्षांचे येणे बंद होईल. तलावात परिसरातील दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने तलाव प्रदूषित झाला आहे. जळगावकरांनी तलाव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सुजाता देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला व्यासपिठावर पतसंस्थेचे उपाध्यक्ष घनश्यामदास अडवानी, संचालक दयानंद कटारीया, सुरेश पाटील, सुधा भावसार, पतसंस्थेच्या सीईओे प्रणिता कोलते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राजक्ता अवचार यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रविण कोतकर, राधिका ठाकूर, हर्षा कुलकर्णी, किरण माहेश्वरी, हर्षाली देवरे, नितीन पाटील, कल्पना पाटील, किसन कदम, सुभाष साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

 

घरटे, धान्य फिडर नोंदणीचे आवाहन

पतसंस्थेच्या माध्यमातून बुधवारी मोफत चिमणी घरटे आणि धान्य फिडरचे वितरण करण्यात आले. परंतु इतर कुणीही पक्षीप्रेमींना चिमणी घरटे 325 रूपयांचे 300 रूपयाला तर धान्य फिडर 115 रूपयांचे 100 रूपयात सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन ललीत बरडीया यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content