मोहिते-पाटलांनीच फोन स्विच ऑफ करून निर्णय घेतलाय : अजित पवार

पुणे : (वृत्तसंस्था) आपली राज्यसभेची मुदत शिल्लक असल्याने माढा लोकसभा मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. मात्र विजयसिंहानी वेगळ्या नावाचा आग्रह धरला. पण माळशिरस वगळता इतर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा विरोध होता. विजयसिंह मोहिते-पाटील हे ज्येष्ठ असल्याने त्यांची लोकसभेत गरज होती. मात्र फोन स्विच ऑफ ठेवत त्यांनी आपला निर्णय घेतला. असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी फोन स्विच ऑफ ठेवत आपला निर्णय घेतला. सुजय विखे यांनाही दक्षिण नगरमधून आम्ही उमेदवारी देण्यास तयार होतो, पण माशी कुठे शिंकली ते माहिती नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Add Comment

Protected Content