दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : अमेरीकेचा पाकला इशारा

 

1850645 imrankhantrumpx 1542652211 759 640x480

 

 

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांवर लवकरात लवकर गंभीर कारवाई करा, असंही अमेरिकेनं पाकला सांगितलं आहे. भारतावर आणखी एका दहशतवादी हल्ल्याचा तुम्ही विचार जरी केलात, तर तुमच्या प्रचंड अडचणी वाढतील, असे खडे बोल अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावले आहेत. व्हाइट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची गरज आहे.

 

पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाविरोधात कारवाईची करण्याची आवश्यकता आहे. जर पाकिस्ताननं दहशतवादावर कारवाई केली नाही आणि भारतावर आणखी एक हल्ला झाल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकते.
भारतानं पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्ताननं काही कारवाई केली आहे. काही दहशतवाद्यांची संपत्ती जप्त केली आहे, तर काहींना अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या काही सुविधांवरही पाकिस्ताननं निर्बंध आणले आहेत. परंतु एवढ्यावरच न थांबता पाकिस्ताननं आणखी आक्रमक कारवाई करावी, असंही अमेरिकेनं म्हटलं आहे.

Add Comment

Protected Content