हिमालयात हिममानवाच्या पावलाचे ठसे? ; भारतीय सैन्याकडून फोटो प्रसिद्ध

army yeti himalaya

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय सैन्याला नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ एका हिममानवाच्या पावलाचे ठसे सापडले आहेत. या हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात. दरम्यान, भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

 

 

आजतागायत हिममानवाच्या अस्तित्वाचे कोणतेच पुरावे शास्त्रज्ञांना सापडलेले नाहीत. परंतु भारतीय सैन्याच्या पथकाला ९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले आहेत. नेपाळ- चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार ३२ X १५ इंच इतका होता. हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे. दरम्यान,नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये लोकांमध्ये एका केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र हिममानव फिरत असल्याची मान्यता आहे. या हिममानवाला स्थानिक लोकं यती या नावाने संबोधतात. ही मान्यता आज-कालची नसून तब्बल २६०० वर्षं जुनी आहे. या परिसरात गिर्यारोहण करणाऱ्या अनेक गिर्यारोहकांनीही यतीला पाहिल्याची कबुली दिली आहे.

Add Comment

Protected Content