देशात मागील २४ तासांत ४७,७०४ नवे कोरोना बाधित रुग्ण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात मागील २४ तासांत ४७,७०४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा १४,८३,१५७ वर पोहचला आहे. तर एकूण ३३,४२५ रुग्णांचा मृत्यूच्या नोंद झाली आहे.

 

 

देशात १४,८३,१५७ पैकी ४,९६,९८८ सक्रीय रुग्ण असून ९,५२,७४४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ६४.२३ टक्के झाले आहे. तसेच देशातील ९ लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. ९,५२,७४४ लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ४,९६,९८८ लोकांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. १०,२३१,८३७ जणांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या १६,६४३,४९८ वर गेली असून ६५६,६२१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यात प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. सोमवारी राज्यभरात ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुसरीकडे, राज्यात ७ हजार ९२४ नवीन कोराेनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ इतकी झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे. सध्या राज्यभरात विविध ठिकाणी १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Protected Content