कोरोनाच्या काळात शाळेची फी मागणाऱ्या संस्थांवर कारवाई करा; ‘आप’चे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

चोपडा प्रतिनिधी । राज्यावर कोरोनाचे संकट येवून ठेवले आहे. कोरोना महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसला आहे. शाळा बंद असतांना पालकांकडून फीची मागणी करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी अशी मागणी येथील आम आदमी पार्टीच्यावतीने गटशिक्षणाधिकारी भावना भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 महामारी दरम्यान राज्यातील उद्योग, व्यापार पूर्णपणे बंद असून यामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला घर कामगार, वाहन चालक, नोकरदार असे सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात आले आहेत . दुसरीकडे पाल्यांच्या शाळा बंद आहेत परंतु शाळा फी भरण्यासाठी सर्वांवर सक्ती होत आहे. पालक हतबल होऊन आपल्या पाल्यांना शाळा सुरु झाल्यावर शिक्षक त्रास देतील या भीतीमुळे हतबल झाल्याने आवाज उठवू शकत नाहीत. परंतु या काळात काही बाबी पूर्ण करत या लाखो पालकांना तातडीचा दिलासा देणे गरजेचे आहे.

या आहेत मागण्या.
राज्य शासनाने फी संदर्भात तातडीने अध्यादेश काढावे, शाळेची फी ५० टक्के कमी करावी, शुल्क अधिनियमन कायद्यात तातडीने बदल करावे, सदरच्या शाळांना ही अतिरिक्त जमा रक्कम परत करण्यास भाग पाडण्यात आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व शाळांचे , मुख्यत्वे ज्यांची वार्षिक फी २५००० पेक्षा जास्त आहे अश्या सर्व शाळांचे ताळेबंद तपासले जावेत व या सर्व शाळांच्या फी वाढीवर सरकारचे नियंत्रण असावे. ऑनलाईन शिक्षणासाठीच्या अतिरिक्त शुल्कास बंदी करावी, फी अंतर्गत नव्याने रक्कम वसूल करण्याचा अधिकार नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुविधा साठी अतिरिक्त रक्कम जमा करणे बेकायदेशीर आहे. त्याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे. सर्व शाळांचे सर्व शुल्क विषयक माहिती शाळेच्या व सरकारच्या वेबसाईटवर टाकणे सक्तीचे असावे. १ मार्च २०१९ च्या पूर्व प्राथमिक शिक्षण धोरण नियमावली कलमानुसार ० ते ६ वयोगटातील मुलांना शिक्षण देणाऱ्या राज्यातील सर्व खाजगी संस्थाना मुलांना शिक्षण देण्यासाठी किती फी आकरावी याचे स्वातंत्र असेल. हा नफेखोरीला मुक्त वाव देणारी नियमावली मध्ये तातडीने सुधारणा करून त्यावर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. निवेदन चोपडा गटशिक्षणाधिकारी भावना भोसले यांच्यामार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले. सादर करतांना रईस खान (आप जिल्हा युवाध्यक्ष), दिनेश पवार, नवेद आलम, राजमल पाटील, विठ्ठलराव साळुंखे, दत्तु पाटील , सुरेश सोनवणे, सागर कोळी, मुनव्वर शेख उपस्थित होते.

Protected Content