‘शिक्षकदिनी’ विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन अध्यापन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज (दि. ५ सप्टेंबर) रोजी ‘सर्वपल्ली राधाकृष्णन’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या विषयाचे ऑडिओ व व्हिडीओ घरीच तयार केले. ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठविले. त्यात अभ्यासाबरोबरच इतर विषयांचे जसे कार्यानुभवाचे कागदाचे खुर्ची टेबल, वर्तमानपत्रापासून वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या तयार करणे, संगीत विषयात बालगीते, चित्रकला विषयात मुक्तहस्त चित्रे,शारीरिक कवायती, संस्कृत मधील श्लोक या घटकावर विद्यार्थ्यांनी अध्यापन केले. शाळेच्या मा. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी तसेच शिक्षकदिनाची माहिती सांगण्यात आली. कार्यक्रम प्रमुख म्हणून कविता पाटील, वंदना सावदेकर, प्रमोद इसे, केतन वाघ, आणि योगश जोशी यांनी काम पाहिले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/314372016460316/

 

Protected Content