औरंगाबादेत दिवसभरात आढळले कोरोनाचे २५ नवीन रुग्ण

 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादेत दिवसभरात कोरोनाचे नवीन २५ रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरातील रुग्णांचा आकडा आता २८५ वर पोहोचला आहे.

 

संजयनगरमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढली आहे, तर नव्याने अनेक हॉटस्पॉट सापडले आहेत. शुक्रवारी गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगर येथील ४७ वर्षीय वाहनचालक तर शनिवारी नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. मालेगावातील बंदोबस्तावरून करमाडजवळील हिरापूर (ता. औरंगाबाद) येथील एसआरपीएफचा जवान सुटीवर घरी आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या सर्वच कुटुंबीयांना चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आज सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडीतील १६ तर बायजीपुरा येथील एक रुग्ण आहे.

Protected Content