आता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सक्तीची संचारबंदी

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना विविध उपाययोजना राबवित आहे. पार्श्वभूमीवर १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे, सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेदरम्यान अत्यावश्यक बाब वगळता विनाकारण फिरण्यास मनाई असल्याने जिल्हावासियांनी संचारबंदीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पुढीलप्रमाणे
१. खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन यांना मनाईचे आदेश आहेत.
२. कोणताही व्यक्ती सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेदरम्यान अत्यावश्यक बाब वगळता विनाकारण फिरण्यास मनाई आहे.
३. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, गर्भवती महिला, गंभीर आजार असलेले व्यक्ती, १० वर्षांखालील बालके यांनी घरीच थांबावे.
४. जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, धार्मिक व सांस्कृतीक कार्यकम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार भरण्यास बंदी घालण्यात आले आहे.
५. लॉकडाऊन काळात कोणताही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. तसेच उघड्यावर थुंकण्यास बंदी करण्यात आली आहे.

दरम्यान वरील दिलेल्या आदेशाचे नागरीकांनी तंतोतंत पालन करावे, कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कलम १४४ प्रमाणे कारवाई करण्यास पात्र असेल असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Protected Content