निस्वार्थी समाजसेवा करणार्‍यांच्या पाठीवर सेवाधर्म सन्मान सोहळ्यात कौतुकाची थाप !

जळगाव प्रतिनिधी | कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेत जळगाव शहरातील सेवाधर्म परिवार हा या सामजिक कार्या कर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करीत असतो. सेवा धर्म परिवार आणि कला सिद्दी फाऊंडेशन चे संयुक्त विद्यमाने आज गोलाणी मार्केट मधील मधील म्युझिक स्टेशन हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

अपघात ग्रस्त रुग्णाला दवाखान्यात घेऊन जात त्याला जीवदान देणारा रिक्षा चालक कलीम शेख,गेल्या आठ वर्षांपासून एच आय व्हीं बाधित मुलांना सकस आहार पुरविणाऱ्या डॉ नीलिमा सेठीया, कोरोना काळात गरजू रुग्णांच्या साठी ऑक्सिजन बेड,जेवण,या सह पूरग्रस्त नागरिकांच्या साठी मदत उभी करून देणारे दिलीप गांधी,शेतकऱ्यांच्या मुलांच्या साठी आणि मनोरुग्णां च्यां पुनर्वसन साठी कार्या करणाऱ्या बोद वड येथील टीम आत्मसन्मान चे विजय पाटील

पोलिस दलात काम करीत असताना आपल्या गाण्याच्या कलेच्या माध्यमातून कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या ,तसेच कौन बनेगा करोडपती मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भाग्यश्री आणि संघपाल तायडे,अपघात ग्रस्त  अनाथ  तरुणास उपचारा साठी थेट मुंबई पर्यंत घेऊन जाणत्या नेरी येथील भावेश पाटील आणि त्यांचा मित्र परिवाराचा या सनमान सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत,पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे,महापौर जयश्री महाजन,सेवाधर्म परिवाराचे  चंद्रशेखर नेवे , कला सिद्दी फाऊंडेशन अध्यक्ष आरती शिंपी, इत्यादी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना महेश शिंपी यांनी केली,सेवा धर्म सन्मान सोहळा मधील सन्मार्थी  नी केलेल्या सामजिक कार्याची माहिती चंद्रशेखर नेवे यांनी विषद केली,तर आरती शिंपी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

समाजात चांगलं काम करणाऱ्या सर्व सामान्य माणसाचा शोध घेऊन त्याच्या चांगुल पणाला प्रोत्साहन देण्यासाठी सेवा धर्म परिवाराच्या वतीने  घेण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात आपल्याला सहभाग घेता आला याचा आपल्याला आनंद असल्याचं मनोगत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले आहे. पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी सुधा या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटल आहे की समाजात काही लोक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असले तरी  जात पात धर्म या पलीकडे जाऊन ,समजा साठी आपण काही देणे लागतो या भावनेने काम करणारी आज चे कार्यक्रमातील सन्मानार्थी हे समाजा साठी आदर्श असल्याचं म्हटल आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटल आहे की चांगलं काम केल्याची दखल घेत सेवा धर्म परिवाराच्या वतीने करण्यात आलेला हा सन्मान सोहळा सर्वांच्या साठी प्रेरणा देणारा ठरणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितसाठी रमेश कुमार मुनोत, बेबीताई खोडपे, अरोही नेवे, सिद्दी शिंपी, महेश शिंपी, अप्पा नेवे यांचं सहकार्य लाभले.

 

Protected Content