नाथाभाऊंना चंद्रकांत पाटलांनी पेढा भरवुन दिल्या शुभेच्छा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा विधानपरीषदेचे नवनिर्वाचित आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद सदस्याची शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अभिंनदन केल्याने चर्चा रंगात आली आहे.

 

आज शुक्रवार दि. ८ जुलै रोजी विधान परिषद सदस्य पदाची एकनाथराव खडसे यांनी सेंट्रल हॉल येथे शपथ घेतली. याप्रसंगी त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडून विधान परिषदेची शपथ ग्रहण केली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव महानगराचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, भुसावळ नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष उमेश नेमाडे, योगेश कोलते , संदिप देशमुख, डॉ.अभिषेक ठाकुर, पृथ्वीराज पाटील, राजुभाऊ बारी आदींना उपस्थित होते. यावेळी नाथाभाऊंचे अभिंनदन करण्यात आले. यावेळी त्यांचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊंना पेढा भरवुन शुभेच्छा दिल्या.

Protected Content