सर्व धर्मीयांच्या भावनांचा आदर राखून साजरी करा ईद – ट्रस्टचे आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ८वाजता बकर ईदची नमाज अदा केली जाणार आहे. याबाबत जळगाव कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टतर्फे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

जळगाव कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टतर्फे ईदगाह मस्जिद येथे जळगाव शहरातील सर्व मशिदीचे मौलाना, विश्वस्त व शहरातील प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व संमतीने बकर ईदची नमाज अजिंठा चौक, ईदगाह मैदानावर रविवार दि. १० जुलै रोजी सकाळी ८वाजता अदा करण्याचे मान्य करण्यात आले आहे. तत्पूर्वी ७.४५ वाजता उर्दू खुदबा सादर होणार आहे तरी जळगाव शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावरच नमाज अदा करावी असे आवाहन जळगाव शहरातील सर्व मशिदीचे इमाम यांनी केले आहे.

रविवार १० जुलै, रोजी आषाढी एकादशी व ईद एकाच दिवशी असल्याने सर्व समाज बांधवांनी इतर कोणाच्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टतर्फे अध्यक्ष वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारुक शेख व सर्व संचालक मंडळांनी केलेले आहे.

पाऊस पडल्यास मस्जिदमध्ये होणार नमाज
रविवारी सकाळी पाऊस असल्यास ईदची नमाज मस्जिद मध्ये होईल. परंतु जरी पाऊस असला तरी इदगाह मैदानाला लागून असलेल्या इदगाह मस्जिद व हॉलमध्ये मर्यादित नामाजीसाठी वेळेवर इद ची नमाज होणार आहे.

Protected Content