मुख्यमंत्री शिंदे यांनी नाकारला स्पेशल प्रोटोकॉल !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवास करत असतांना सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून स्पेशल प्रोटोकॉल नको असे निर्देश आज दिले आहेत.

 

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल   नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी आधी चर्चा करून लागलीच निर्देश दिले आहेत.

 

या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापुढे आपण प्रवास करत असलेल्या मार्गावर पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही, याची खबरदारी घ्या. आमचे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद करत स्पेशल प्रोटोकॉल नाकारला आहे.

Protected Content