नुतन पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांनी स्वीकारला पदभार

rajendra sasane

अमळनेर (प्रतिनिधी) येथील डिवायएसपी रफीक शेख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी राजेंद्र ससाणे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. श्री.ससाणे यांचा नुकताच विविध संघटना व संस्थांमार्फत सत्कार करण्यात आला.

राजेंद्र ससाणे यांनी 1989 ला एम.पी .एस. सी च्या माध्यमातून ते पीएसआय झाले .त्यानंतर धुळे गडचिरोली, धुळे ,नगर ,अमरावती, पुणे शहर ,नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमी ट्रेनिंग सेंटरमध्ये अडीच वर्षे प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिली. त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सन्मानही झाला आहे. सर्व पोलीस निरीक्षक प्रभारी यांची एक बैठक घेऊन जे अट्टल गुन्हेगार असतील त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात येतील. तसेच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील असे सांगितले.

Add Comment

Protected Content