स्पिरीट व रसायन मिश्रीत अवैध दारूची विक्री

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारूच्या गुत्यावर स्पिरीट व रसायन मिश्रीत दारूची विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात असलेल्या एका दारूच्या गुत्यावर एक जण स्पिरीट व रसायन मिश्रीत दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार २७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता अमळनेर शहर पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत १५० लिटर स्पिरीट व रसायन मिश्रीत दारू आढळून आली. ही दारू आरोग्याला हानीकारक असल्याने तळीरामांनी दारू पिण्यापासून सावधान रहावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विशाल दशरथ चौधरी रा. भोईवाडा. अमळनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!