बहुतांश ग्रामपंचायतींवर आमचेच सरपंच; भाजपासह राष्ट्रवादीचा दावा

 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.शांततेने पार पडलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठराविक गावे आधीच बिनविरोध झाली आहेत.

अमळनेर तालुक्यात २४ पैकी १६ ग्रामपंचायतींवर भाजपने विजयाचा दावा केला आहे,नूतन लोकनियुक्त सरपंचांचे माजी आ.स्मिता वाघ यांनी अभिनंदन देखील केले आहे.भविष्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.तर दुसरीकडे 13 ग्रा प वर राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच तर, 16 जागांवर महाविकास आघाडीचे सरपंच विराजमान झाल्याने महाविकास आघाडीच वरचढ ठरल्याचा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी केला आहे.यानिमित्ताने आमदारांच्या निवासस्थानी प्रचंड जल्लोष देखील करण्यात आला.

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामिण जनतेचे राष्ट्रवादी तथा महाविकास आघाडीला तालुक्यात कौल देऊन सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटास नाकारले असल्याचाही दावा सचिन पाटील यांनी केला आहे.

या गावांमध्ये आहेत राष्ट्रवादीचे सरपंच

सचिन पाटील यांनी अधिकृतपणे दावा करताना या निवडणुकीत वावडे, सुंदरपट्टी, हेडावे, कामतवाडी, गंगापुरी, आमोदे, तासखेडा, रुंधाटी, जैतपिर, अंबारे-खापरखेडा, जानवे आदी ठिकाणी राष्ट्रवादी चे सरपंच विजयी झाल्याचा दावा केला असून नगाव बु व मारवड काँग्रेस, इंदापिंप्री सर्वपक्षीय, नगाव खुर्द शिवसेना उद्धव ठाकरे गट विजयी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि भाजपा नेते बनावट दावा करीत असले तरी त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या उमेदवारांची गावनिहाय यादी व नावे जाहीर करावीत असे आव्हान देखील सचिन पाटील यांनी दिले आहे.

भाजपाने केला आहे याठिकाणी दावा

अंतुर्ली, चोपडाई, निमझरी, तासखेडा, आमोदे, हेडावे, कामातवाडी, कोंढावळ, डांगर बु, डांगर, मुंगसे, इंद्रापिंपरी, मारवड, बाम्हणे, कन्हेरे या गावांमध्ये भाजप प्रणित उमेदवार व ग्रामपंचायत ताब्यात आल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील खोट्या वलगाना करत आहेत खोटं बोल पण रेटून बोल हा भाजपाचा धंदा नाही राष्ट्रवादी च्या नेत्यांसारख खोटं बोलण आम्हला जमत नाही जे आहे ते प्रत्यक्षात आहे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्या वल्गना करतायेत त्या हवेत विरणारे आहेत. राज्याच्या डबल इंजिन सरकारला जनतेने कौल दिलेला आहे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व नेते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमळनेर तालुक्यातील ग्रामीण जनतेने भाजपाला कौल दिलेला आहे.

– ॲड.व्ही आर पाटील, माजी जि प सदस्य जळगांव

दरम्यान ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक पातळीवरील गावातील भाऊबंदकी तसेच जोपासले जाणारे हितसंबंध खास करून मित्र परिवार याच्यावरच लढवली जाते.तरीदेखील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी निकालानंतर दावे प्रतिदावे करतात. विशेष म्हणजे या निवडणुकीत आमचाच पक्ष वरचढ ठरला आहे, हे आवर्जून सांगितले जाते.त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण देखील ऐन हिवाळ्यात तापलेल पहावयास मिळत आहे. उरले सुरले तालुक्यातील जैतपिर येथे आम आदमी पार्टी ने खाते उघडल्याचा दावा केला आहे.अवघे 24 ग्रामपंचायत चे निकाल लागले असताना,एकीकडे भाजपाने 16 ग्रामपंचायतींवर आम आदमी पार्टी 1 तर महाविकास आघाडीने देखील ग्रामपंचायतीत 16 जागांवर सत्ता प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे.दावा केलेल्या आकडेवारीचा हिशोब केला तर तो आकडा 33 वर जाऊन पोहचतोय.राजकीय मंडळीने नेमके हे गणित कोठून शोधून काढले आहे.याचा देखील खुलासा करावा असे जनमानसातून बोलले जात आहे. विजयाच्या दाव्याने जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याची तसदी देखील घ्यावी. जेणेकरून ही गुंतागुंत मोकळी होण्यास मदत होईल.

राजकारण्यांनी राजकारण निश्चित करावे मात्र त्यापलीकडे जाऊन जनतेला उल्लू बनवणे ही थांबवले पाहिजे?कारण शेवटी जनता जनार्दन असते.हे पुढाऱ्यांनी विसरता कामा नये.असे तालुक्यातुन चर्चिले जात आहे!

Protected Content