देशात ११ ते १४ एप्रिलच्या दरम्यान लसीकरण महोत्सव

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या प्रतिकारासाठी देशभरात ११ ते १४ एप्रिलच्या दरम्यान लसीकरण महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज पंतप्रधान मोदी यांनी केली. ते मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेवर चर्चा झाली. देशात पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालीय. काही राज्यात चिंताजनक स्थिती असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाने कोरोना संसर्गाची पहिली लाट पार केली. पण दुसरी लाट पहिल्यापेक्षा प्रभावी आहे. सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. यावेळी देशातील नागरिकही पहिल्यापेक्षा जास्त बिनधास्त बनले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधानांनी या बैठकीत मांडलं.

तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कुठल्याही प्रकारचा बेजाबदारपणा होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आपल्याला लोकांना हे वारंवार सांगावं लागेल की लस घेतल्यानंतरही मास्क आणि सावधगिरी बाळगा. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपण लसीकरण उत्सव साजरा करु, असं आवाहनही मोदींनी यावेळी केलंय.

 

 

Protected Content