शाहू नगर रिक्षा स्टॉप फलकाचे भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्याहस्ते अनावरण(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन संचलीत शाहू नगर रिक्षा स्टॉप फलकाचे अनावरण आज शुक्रवार १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी डॉ. मनीष चौधरी, नेताजी सुभाष चंद्रबोस रिक्षा युनियनचे अध्यक्ष किशोर साळुंखे, उपाध्यक्ष हकीम खाटीक, उपाध्यक्ष रविंद्र टेकवाडे, सचिव हिराला टेकावडे, सहसचिव कैलास पांढरे, खजिनदार कैलास चौधरी, सल्लागार सलिम खाटीक, रियाज यूसुफ हरदास, प्रमोद वाणी, दीपक सोनवणे, संदीप वाणी, जगदीश सोनवणे, ताराचंद पाटील, भूषण सपकाळे, सुनील चौधरी, सुनील जाधव, पद्माकर पाटील, जे. डी. भालेराव, प्रभाकर तायडे, प्रल्हाद सोनवणे  आदी उपस्थित होते.

 

यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी म्हणाले की, कोरोनाच्या काळात रिक्षा चालकांचे मोठ हाल झाले. यावेळी युनियनच्या माध्यमातून अनेक रिक्षा चालकांना मदत व सहकार्य केले. तर युनियनच्या माध्यमातून शाहू नगर परिसरातील नागरीकांना तातडीने रिक्षा सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ग्वाही रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यांनी बोलतांना सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1111141962750731

 

Protected Content