सावदा येथील ट्रक चालकाचा अपहरण करणाऱ्या एकाला अटक; घातपातची शक्यता

सावद ता. रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील ३५ वर्षीय तरूणाचे ट्रकसह अपहरण करून घातपात केल्याच्या संशयावरून सावदा पोलीसांनी एकाला अटक केली आहे. तर ट्रकला परस्पर विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की,  रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल (वय-३५) हा त्याची मालवाहू ट्रक (एम एच १९ सीवाय ६८४३) घेऊन जात असताना १५ मे २०२१ सकाळी १०  वाजता ऋषिकेश ऊर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ (वय-२४)  रा.दावरवाडी ता.पैठण जि. औरंगाबाद, राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पवन नगर नाशिक आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही) रा\ औरंगाबाद यांनी संगनमताने करून याकूब पटेल यांचे अपहरण करून त्याच्या ताब्यातील ट्रक नागपूर येथे विक्री करून विल्हेवाट लावली होती. सुरुवातीला सावदा फैजपूर येथे याकूब पटेल यांची बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती, त्यानंतर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सावदा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर संशयित आरोपी ऋषिकेश ऊर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ याला सावदा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान अपहरण झालेले याकुब पटेल यांचा अजून बेपत्ताच आहे. याकुब पटेल यांना ठार मारल्याच्या संशयाबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तीन जणांवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, विभागीय पोलिस अधिकारी विवेक लवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, सुरेश आठवले, मोहसीन खान पठाण, विशाल खैरनार यांच्यासह सावदा पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

Protected Content