दहा लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा १० लाख रूपयांसाठी छळ करणाऱ्या भिवंडी येथील पतीसह चार जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मैत्रेय नरेंद्र सुर्यवंशी रा. भिवंडी जि. ठाणे ह.मु.चाळीसगाव यांचे विवाह २९ जून २०२० रोजी भिवंडी येथील नरेंद्र अशोक सुर्यवंशी यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. लग्नात विवाहितेच्या आईवडीलांनी १६ तोळे दागिने दिले होते. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीकडून मानसिक छळ सुरू झाला. ‘मला तू आवडत नाही, आईवडीलांच्या सांगण्यावरून लग्न केले आहे.’ असे सांगून बोलने बंद केले. हा प्रकार विवाहितेने आईवडीलांना सांगितला त्यांनी विवाहितेची समजूत काढली. २९ ऑगस्ट २०२० रोजी सासून पुष्पा अशोक सुर्यवंशी, नणंद सपना भास्कर असवले, नंदोई भास्कर शिवाजी असवले रा. भिवंडी जिल्हा ठाणे यांनी माहेरहून १० लाख रूपये आणावे तरच चांगली वागवणूक मिळेल नाहीत माहेरी निघून जा. वडीलांची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी एवढे पैसे देवू शकत नाही असे सांगितल्यावर त्यांनी विवाहितेला घरातून हाकलून दिले. याला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरूध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content